महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलढाण्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण ठार; मृतांमध्ये एका चिमुरड्याचाही समावेश

बुलडाणा - जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील अंजनी फाट्याजवळ स्कॉर्पीओ आणि ट्रकमध्ये भीषण अपघात घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण ठार झाले असून ३ जण गंभीर जखमी झाले आहे.

बुलढाण्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण ठार

By

Published : Apr 15, 2019, 9:51 AM IST

Updated : Apr 15, 2019, 1:23 PM IST

बुलडाणा- जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील अंजनी फाट्याजवळ स्कॉर्पीओ आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण ठार झाले असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी हे कुटुंब मेहकर कडून अंजनी फाट्याकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकसोबत त्यांची भीषण टक्कर झाली. या अपघातात जुमडे कुटुंबातील ५ जण जागीच ठार झाले. या अपघातात इतर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये १ वर्षीय चिमुरड्याचाही समावेश आहे.

बुलढाण्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण ठार

मृतांमध्ये मनोहर कुंडलीक जुमडे (५०), गोलु मनोहर जुमडे (२२), जयवंत श्रीरंग जुमडे (६०), कमल विश्वास जुमडे (४०) यांच्यासह १ वर्षिय मुलाचा समावेश आहे. तर जखमींमध्ये ताई मनोहर जुमडे (४५), नेह मनोहर जुमडे (२२), प्रतिक संतोष जुमडे (१५) यांचा समावेश आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Last Updated : Apr 15, 2019, 1:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details