बुलडाणा -दुबईवरून बुलडाण्यात परतलेल्या त्या ६५ वर्षीय गृहस्थाची ओमायक्रॉन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह ( Omicron Test Report Positive ) आला आहे. संबंधीत रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना कुठलीही लक्षणे नसली तरी एकूण १४ दिवस निरीक्षणात ठेवण्यात येणार नाही. दिलासादायक बाब म्हणजे संबंधीत व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्ती कोरोना निगेटिव्ह ( All Persons in Contact are Corona Negative ) आहेत. मागील ९ डिसेंबर रोजी दुबईवरून आलेले हे गृहस्थ कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांचा स्वॅब नमुना पुणे येथे ओमायक्रॉन चाचणीसाठी ( Omicron Test at Pune ) पाठविण्यात आला होता. चार दिवसानंतर हा अहवाल प्राप्त झाला आहे. तो ओमायक्रोन पॉझिटीव्ह आला आहे.
ओमायक्रॉनग्रस्त व्यक्ती ठणठणीत असून १४ दिवसांच्या प्रोटोकॉलनंतर त्यांना सुट्टी देण्यात येणार आहे. मात्र ओमायक्रॉनचा बुलडाणा जिल्ह्यात शिरकाव झाल्याचे स्पष्ट आहे. विदर्भातील दुसरा रुग्ण बुलडाण्यात आढळला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा रुग्ण दुबईवरून आलेला होता. आता रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.