महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुःखद ! कॅन्सरग्रस्त मातेचा मृत्यू, 'आई माझी दयेचा सागर' लिहून मुलाची आत्महत्या तर वडिलांना हृदयविकाराचा झटका - हृदयविकार

कॅन्सरग्रस्त आईची मृत्यूची बातमी ऐकताच त्याचवेळी मुलाने हातावर "आई माझी दयेचा सागर.." असे लिहित गळफास घेऊन आत्महत्या केली. तर मुलीचे निधन झाल्याचे कळताच वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला.

मृत वैशाली मुलगा संकेत

By

Published : Apr 10, 2019, 5:14 PM IST

बुलडाणा- कॅन्सरग्रस्त आईची मृत्यूची बातमी ऐकताच त्याचवेळी मुलाने हातावर "आई माझी दयेचा सागर.." असे लिहित गळफास घेऊन आत्महत्या केली. तर मुलीचे निधन झाल्याचे कळताच वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला. ही दुर्दैवी घटना ८ एप्रिलला शेंदूरजन येथे घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


शेंदूरजन येथील तुळशीदास किसन क्षीरसागर हे मुंबईतील राज्य सहकारी बँकेमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सद्या ते मुंबईत एकटेच राहतात. तर त्यांचे कुटुंबीय बुलडाण्यातील शेंदूरजन येथेच राहत आहेत. त्यांना एक मुलगी आहे. तिचे नाव वैशाली असून तिचा विवाह चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील सुरेश बोर्डे यांच्याशी झालेला होता. वैशाली बोर्डे हिला मागील काही वर्षांपासून कॅन्सरच्या विकाराने ग्रासले होते. त्यामुळे तिच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु होते. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे वृत्त तुळसीदास यांना बुधवारी सकाळी शेंदूरजन मिळाली. हे वृत्त ऐकताच मृत वैशालीचे वडिल तुळशीदास क्षीरसागर यांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा त्यांना स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना चिखली येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.

मृत वैशाली मुलगा संकेत

याचवेळी त्यांच्या घरी शेळगाव आटोळ येथे जाण्याची तयारी उर्वरित कुटुंबीयांनी सुरु केली. मृत वैशाली ही कॅन्सरग्रस्त असल्याने तिचा मुलगा संकेत, (वय १९) हा शेंदूरजन येथेच राहत होता. आजोबांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्याला आई वैशाली हिच्या मृत्यूची माहिती उशीरा मिळाली. एकीकडे कुटुंबीय शेळगाव आटोळ येथे जाण्याची तयारी करीत असताना त्यालाही तयार होण्याचे सांगण्यात आले. मात्र, आईच्या मृत्यूची बातमी ऐकल्यामुळे त्याला मानसिक धक्का बसला.


तेव्हा संकेतने घराच्या वरच्या खोलीचा दरवाजा बंद करून येतो म्हटले व तो वरच्या मजल्यावर गेला. बराच वेळ झाला तरी संकेत खाली येत नसल्याचे बघत कुटुंबीय वरच्या खोलीकडे गेले. त्यावेळी संकेतने खोलीच्या पत्राच्या खाली आधार असलेल्या पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने स्थानिक खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी संकेतचा मृत घोषीत केले.


आत्महत्या करण्यापूर्वी संकेतने आपल्या तळहातावर "आई माझी दयेचा सागर .." असे लिहिलेले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वैशाली व संकेत सुरेश बोर्डे या दोघा मायलेकांवर अंतिमसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात दुःख व्यक्त केले जात आहेत. संकेत बोर्डे याच्या आत्महत्ये प्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details