बुलडाणा : शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू केलेले आंदोलन पोलिसांनी दाडपले आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत हे आंदोलन दडपून टाकले. त्यामुळे रविकांत तुपकर हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पोलीस कोठडीत मी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी बोलताना केली आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न :रविकांत तुपकर यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. तुपकर यांनी पोलिसाच्या वेशात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:वर पेट्रोल ओतून घेतले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. तसेच त्यांच्या आईदेखील घटनास्थळी उपस्थित होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर शेतकरी प्रकणावर आज आक्रमक झालेले पाहयला मिळाले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकर यांनी पोलिसाच्या वेशात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:वर पेट्रोल ओतून घेतले. सध्या पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू आहे.
काय आहे कारण :रविकांत तुपकर यांनी कापूस, सोयाबीन आणि पीक विम्याच्या प्रश्नांवर सरकारला १० फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. तुपकर यांनी पोलिसाच्या वेशात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. बुलढाणा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर आज हजारो शेतकरी जमा झाले आहेत. तुपकर गेल्या चार दिवसांपासून भूमिगत होते. पोलीस त्याचा शोध घेत होते. आज रविकांत तुपकर यांना बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुंबईतील एआयसी पीक विमा कंपनी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता.