बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर पंचायत समितीतील शाखा अभियंत्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले. गजानन टोबरे असे लाच स्विकारणाऱया अभियंत्याचे नाव आहे. ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता कामाचे बिल काढण्यासाठी टोबरे यानी ही लाच स्विकारली होती.
मलकापूर पंचायत समितीचा अभियंता लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात - engineer traped
वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्तीमध्ये रस्ता बांधण्यासाठी आलेल्या निधीतून रस्ता कामाचे बिल काढण्यासाठी अडवणुक करण्यात येत होती.
वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्तीमध्ये रस्ता बांधण्यासाठी आलेल्या निधीतून रस्ता कामाचे बिल काढण्यासाठी अडवणुक करण्यात येत होती. अखेरीस बिल काढण्यासाठी पैशाची मागणी झाल्याने अकोला लाचलुचपत विभागाकडे याबाबतची तक्रार करण्यात आली.
गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अभियंता गजानन टोबरे हे ग्रामपंचायत सदस्य दिपक गाडे यांच्याकडून ५ हजारांची लाच स्विकारत असताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय अकोल्याचे निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.