बुलडाणा -जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची खोटी माहिती समाज माध्यमांवर पसरवण्यात आली होती. मात्र, अशा खोट्या माहितींवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. आरोग्य विभागाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी केले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडित यांचे नागरिकांना आवाहन... हेही वाचा....'कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करण्याचे पवारांकडून आदेश - नवाब मलिक
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण सापडल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियामध्ये पसरत आहे. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नसल्याचा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडित यांनी केला आहे. कोरोना रुग्णाबाबत कोणालाही माहिती घ्यायची असेल त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाशी किंवा स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन पंडित यांनी केले. मात्र, जर कोणी कोरोनाच्या अशा अफवा पसरवत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिला आहे.
हेही वाचा....पुण्यातील कोरोनाग्रस्तांची प्रकृती चांगली, संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क - म्हैसेकर