महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ST Strike.. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 'त्या' एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; बुलडाण्यातील कर्मचारी संतप्त - त्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान बुधवारी रात्री नऊच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली (st employee strike). कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व राज्य शासन (Maharashtra ST) यासंदर्भात कुठलाही निर्णय घेत नसल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे परिवारातील सदस्यांना विशालने सांगितले होते. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संतप्त आहेत (ST Strike).

एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

By

Published : Nov 18, 2021, 10:43 AM IST

Updated : Nov 18, 2021, 1:07 PM IST

बुलडाणा - खामगाव आगारातील (Khamgaon Depot) विष पिऊन आत्महत्येचा (attempted suicide) प्रयत्न करणाऱ्या सहायक मेकॅनिक पदावर कार्यरत असलेल्या विशाल अंबलकर (Vishal Ambalkar) यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशाल अंबलकर या कर्मचाऱ्यांने मंगळवारी रात्री विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बुलडाणा जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्याची (ST Workers) ही पहिली आत्महत्या असल्यामुळे जिल्ह्यातील आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

अखेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

अजूनही तोडगा नाही -

राज्यात एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा (ST Workers strike) आजचा 12 वा दिवस आहे. राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये अद्यापपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता कर्मचारी आत्महत्येच्या दिशेने वळत असल्याचे दिसून येत आहे. एसटी कर्मचारी आंदोलनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 200 च्या जवळपास कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. कारवाईचे सत्र एसटी महामंडळाकडून सुरू असताना आपल्यावरही निलंबनाची पाळी येईल या भीतीपोटी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी असलेल्या या कर्मचाऱ्याने दोन दिवसापूर्वी विष घेतले होते.

भीतीपोटी घेतलं विष -

दरम्यान त्यांच्यावर खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital at Khamgaon) व नंतर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान बुधवारी रात्री नऊच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व राज्य शासन यासंदर्भात कुठलाही निर्णय घेत नसल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे परिवारातील सदस्यांना विशालने सांगितले होते. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संतप्त आहेत. गुरुवारी सकाळी अंबलकर यांचे मृतदेह त्यांच्या गावी आणण्यात आले. यानंतर जिल्हाभरातील एसटी कर्मचारी माटरगाव (Matargaon) या गावात पोहोचले होते. राज्यभरात आतापर्यंत ४० च्यावर आत्महत्या झालेल्या असताना बुलडाणा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांची ही पहिली आत्महत्या आहे.

विशाल अंबलकर

साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

१० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST workers strike) संप सुरू असून एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबना सुरु आहे. असे असतानाच साताऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेढा एसटी आगारातील (Medha bus depo) कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (ST worker dies of heart attack) झाला आहे. जावळी तालुक्यातील (Jawali Taluka) मेढा एसटी आगारात ते सेवेत होते. संतोष वसंत शिंदे (वय ३४, रा. आसगाव ता. सातारा) (Santosh Vasant Shinde) असे मृत कर्मचा-याचे नाव आहे. तुटपुंजा पगार व संपामुळे ते तणावाखाली होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतोष शिंदे यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. तीन वर्षांपूर्वी ते मेढा एसटी डेपोमध्ये रुजू झाले होते. अशातच लॉकडाऊन (Lockdown) लागले व आता संप सुरू झाला.

संप सोडून काल ७ हजार ६२६ एसटी कर्मचारी कामावर हजर!

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर (st workers strike) गेले आहे. हा संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची (st workers suspension) कारवाई सुरूच ठेवली असून, ९ नोव्हेंबरपासून आतापर्यंत २ हजार १७८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईच्या धास्तीने कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. आज कामावर येणाऱ्यांची संख्या ७ हजार ६२६ झाली आहे (St employees join office).

निलंबित एसटी कामगाराने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहले पत्र

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांचा हा संप बेकायदेशीर असल्याचे सांगत वाशिम, रिसोड, कारंजा व मंगरुळपीर या चार आगारातील 66 कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी एक निलंबित एसटी वाहकाने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहीले आहे. रामेश्वर मुसळे, असे त्या वाहकाचे नाव असून त्यांनी सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

Last Updated : Nov 18, 2021, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details