बुलडाणा - लोणार तालुक्यातील शारा या गावातील शेतकरी गणेश प्रल्हादराव डव्हळे या शेतकऱ्याने शेतात ओडीसी हे तननाशक फवारणी केल्यामुळे १५ एकर मधील सोयाबीन व तुर ही पिके या औषधी फवारणीमुळे जळाली आहेत. यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
बुलडाण्यात तननाशक फवारल्याने १५ एकरमधील सोयाबीन व तुर जळाली
लोणार तालुक्यातील शारा या गावातील शेतकरी गणेश प्रल्हादराव डव्हळे या शेतकऱ्याने शेतात ओडीसी हे तननाशक फवारणी केल्यामुळे १५ एकर मधील सोयाबीन व तुर ही पिके या औषधी फवारणीमुळे जळाली आहेत.
नुकसान झालेली पिके
याबाबत शेतकऱ्याने कृषी विभागाशी संपर्क साधला त्यानुसार कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कुषी अधिकारी तसेच ओडीसी कंपनीचे अधिकारी शेतात जाऊन पाहणी केली. शेतातील नुकतीच उगवुन आलेली सोयाबीन व तुर ही पिके जळालेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. १५ एकर वरील सर्व पिके जळुन गेल्याने नुकसान भरपाई देऊन संकटात सापडलेल्या आधार द्यावा, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.