महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपघातग्रस्त वाहनाचे टोचण करुन निघालेल्या क्रेनची दुचाकीला धडक; 2 ठार

काटी धानोरा फाट्याजवळ अपघातग्रस्त वाहनाला टोचण करुन निघालेल्या क्रेनने दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात २ जण जागीच ठार झाले.

अपघाग्रस्त गाड्यांना लागलेली आग

By

Published : Apr 10, 2019, 6:26 PM IST

बुलडाणा- जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरिल काटी धानोरा फाट्याजवळ अपघातग्रस्त वाहनाला टोचण करुन निघालेल्या क्रेनने दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात २ जण जागीच ठार झाले. ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. शुभम हिवाळे (वय २२, रा. काटी) आणि ज्ञानेश्वर इंगळे (वय ५५) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

अपघाग्रस्त गाड्यांना लागलेली आग

नांदुरा येथून मलकापूरकडे येणाऱ्या अपघातग्रस्त वाहनाला टोचण करुन क्रेन निघाली होती. तेव्हा समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला क्रेनने धडक दिली. दुचाकी क्रेनमध्ये अडकली तेव्हा क्रेनने दुचाकीला तब्बल एक किलोमीटरपर्यत फरफटत नेले. त्यावेळी घर्षण होऊन तिन्ही वाहनांनी पेट घेतला.


घर्षणाने लागलेल्या आगीमध्ये तीनही वाहने जळून खाक झाली. यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरिल वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details