बुलडाणा - EVM च्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून सोमवारी १७ जूनला संपूर्ण राज्यासह बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकरी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
ईव्हीएम हटाओ, देश बजाओचा नारा देत वंचितचे EVM विरोधात घंटानाद आंदोलन..
लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतमोजणी दरम्यान मतांच्या आकडेवारीत तफावत आढळल्याने एव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत वंचीत बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघा तर्फे सोमवारी १७ जून एव्हीएम मशीनच्या विरोधात बुलडाणा जिल्हयात सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतमोजणी दरम्यान मतांच्या आकडेवारीत तफावत आढळल्याने एव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत
वंचीत बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघा तर्फे सोमवारी १७ जून एव्हीएम मशीनच्या विरोधात बुलडाणा जिल्हयात सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी एव्हीम मशीन हटाव देश बचाव घोषणा देत आगामी विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद,नगर परिषद व नगरपंचायतीच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरने घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात मोठ्या संख्येने वंचीत आघाडी व भारिपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.