महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Buldhana Accident : भरधाव ट्रकनं झोपडीत साखरझोपेतील 10 मजुरांना चिरडलं, चौघांचा मृत्यू

Buldhana Accident : बुलढाणा जिल्ह्यातील मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरनजीक वडनेर भोलजी या गावाजवळ मध्य प्रदेशातून महामार्गाच्या कामासाठी आलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडलं.

Buldhana Accident
Buldhana Accident

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 10:43 AM IST

Updated : Oct 2, 2023, 12:36 PM IST

बुलढाणा Buldhana Accident :मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बुलढाण्यातील खामगाव-मलकापूर दरम्यान वडनेर गावाजवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात महामार्गाच्या बाजूच्या झोपडीत झोपलेल्यांना ट्रकनं चिरडलंय. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी आहेत. रस्त्याच्याकडेला झोपलेले सर्व मजूर होते. सर्व जखमी मजुरांवर मलकापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याच्या प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संपुर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला आहे.

अपघातात तिघांचा मृत्यू : चिखलदरा तालुक्यातील दहा मजूर रोजगाराच्या शोधात भटकंती करत बुलढण्यातील नांदुरा येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात रुजू झाले होते. हे मजूर महामार्गाच्या कडेला झोपडीत झोपले असताना, आज पहाटेच्या सुमारास वडनेर भोजली गावाजवळ मजुरांच्या झोपडीत भरधाव ट्रक घुसल्यानं हा अपघात घडल्याचं समोर आलंय. या घटनेत २६ वर्षीय तरुण प्रकाश बाबू जांभेकर व पंकज तुळशीराम जांभेकर, यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर १८ वर्षीय युवक अभिषेक रमेश जांभेकर, राजाराम दादू जांबेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर राजा जादू जांभेकर व २५ वर्षीय दीपक खोजी बेलसरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रस्त्यावर रक्ताचा सडा : याबाबत माहिती देताना नांदुरा येथील ठाणेदार अनिल बेहरानींनी सांगितलं की, ट्रक चालकानं आदिवासी मजुरांना चिरडल्याची घटना घडली असून यात चौघ ठार तर दोघं गंभीर जखमी आहेत. इतर जखमींवर मलकापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावलाय.

हेही वाचा :

  1. Accident on Nagar Kalyan Highway : रस्त्यानं चालत जाणाऱया पाच शेतमजुरांना कारनं चिरडलं; तिघांचा मृत्यू
  2. Telangana Tourist Car Accident : चिखलदरा फिरायला आलेल्या तेलंगाणातील पर्यटकांच्या कारचा अपघात; चार बँक अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू
  3. British Embassy Secretary Car Accident : ब्रिटिश दूतावासाच्या सचिवांच्या कारला अपघात; खासगी बस चालकावर गुन्हा
Last Updated : Oct 2, 2023, 12:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details