बुलडाणा -कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत लॉकडाऊन असून, नियमभंग करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी लाठ्यांनी झोडपल्यानंतरही त्यांच्यावर काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अशा टवाळखोरांवर बुलडाणा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, 60 ते 65 टवाळखोरांना पोलिसांनी स्थानबद्ध करून यांच्यामधून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कलम 188 नुसार कारवाई केली आहे.
बुलडाणा पोलिसांचा टवाळखोरांविरुध्द कारवाईचा बडगा; घरातच राहण्याचे केले आवाहन
विनाकारण फिरणाऱ्यांवर बुलडाणा पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरी थांबण्याची विनंती करण्यात आली आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा ठाणेदार साळुंखे यांनी दिला आहे.
कलम 188 मध्ये 1000 रुपयांचा दंड अथवा 1 वर्षाची कैद अशी शिक्षा आहे. त्यामुळे अशा शिक्षेला सामोरे न जाता घरीच राहण्याचे आवाहन बुलडाणा शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी केले आहे. संपूर्ण भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोगाचा झपाट्याने होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, विनाकारण फिरणाऱ्यांवर बुलडाणा पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरी थांबण्याची विनंती करण्यात आली आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा ठाणेदार साळुंखे यांनी दिला आहे.