बुलडाणा- व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या ७ तासांत शहर पोलिसांनी घटनेचा छडा लावला.
डोळ्यात मिर्ची पावडर फेकून व्यापाऱ्याला लुटणारे तिघे अवघ्या ७ तासांत जेरबंद
व्यापाऱ्याच्या बॅगेत जवळपास ७० ते ८० हजार रुपये रोख रक्कम आणि १० ते २० हजार रुपयांचे मोबाईल रिचार्ज व्हॉउचर्स होते.
जिल्ह्यातील खामगाव शहरातील त्रिलोक कृपालदास लखानी हे नेहमीप्रमाणे गुरुवारी २८ मार्च रोजी आपले स्वीट मार्टचे दुकान बंद करून घरी जात होते. दरम्यान, नॅशनल शाळेच्या बाजूला तिघांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. यानंतर ते मोटार सायकलवरून खाली पडले. यावेळी अज्ञात युवक त्यांच्या हातातील पैशांची बॅग घेऊन फरार झाले. बॅगेत जवळपास ७० ते ८० हजार रुपये रोख रक्कम आणि १० ते २० हजार रुपयांचे मोबाईल रिचार्ज व्हॉउचर्स होते.
खामगांव शहर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून घटनेचा अवघ्या ७ तासांतच छडा लावत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व एसडीपीओ पथकाने ही संयुक्त कारवाई केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील, शहर पोलिस निरीक्षक संतोष ताले उपस्थित होते.