बुलडाणा -जिल्ह्यातील कोरोना संशयीत असलेल्या नागरिकांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 12 अहवाल आज मंगळवारी 26 मे रोजी प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 9 अहवाल निगेटिव्ह, तर 3 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये चांदुर बिस्वा (ता. नांदुरा) येथील आधीच्या कोरोनाबाधित युवकाच्या निकट संपर्कातील 16 व 12 वर्षीय युवती आहेत. तसेच चिखली येथील 24 वर्षीय महिलेचा समावेश आहे. सदर महिलेचा मुंबई प्रवास इतिहास आहे.
बुलडाणा कोरोना अलर्ट : पुन्हा आढळले 3 कोरोनाचे रुग्ण तर एकाला सुट्टी - बुलडाण्यात 3 कोरोनाचे रुग्ण
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संशयीत असलेल्या नागरिकांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 12 अहवाल आज मंगळवारी 26 में रोजी प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 9 अहवाल कोरोना निगेटीव्ह, तर 3 अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आढळले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत 880 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 48 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आज शेगांव येथील 35 वर्षीय एका कोरोनाबाधित रूग्णाला वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 27 कोरोनाबाधित रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 27 आहे. सध्या रूग्णालयात 18 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज 26 मे रोजी 12 अहवाल प्राप्त झाले आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेले नमुने 59 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 880 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.