बुलडाणा -कोरोना संसर्गाचे प्रमाण गत तीन ते चार दिवसांपासून अचानक वाढले आहे. हे प्रमाण नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क वापरणे, हात सॅनीटाईज करणे किंवा स्वच्छ धुणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे या बाबींचा अवलंब करावा. जे कुणी बाहेर पडल्यानंतर मास्क लावणार नाहीत, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस यंत्रणा दंडात्मक कारवाई करेल. तसेच शहरांमध्ये ज्या दुकानांसमोर सोशल डिस्टसिंग पाळले जाणार नाही. किंवा तिथे विना मास्क ग्राहक दिसतील, अशा दुकानदारांवरसुद्धा करवाई करावी, असे निर्देश बुलडाणा जिल्हाधिकारी शंकर रामामुर्थी यांनी दिले.
विनामास्क, सोशल डिस्टसिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई- बुलडाणा जिल्हाधिकारी - buldana news
कोरोना संसर्गाचे प्रमाण गत तीन ते चार दिवसांपासून अचानक वाढले आहे. हे प्रमाण नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क वापरणे, हात सॅनीटाईज करणे किंवा स्वच्छ धुणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे या बाबींचा अवलंब करावा.
बुलडाणा जिल्हाधिकारी
पॉझीटीव्ह रूग्णांना देण्यात येणारे होम आयसोलेशन करण्यात आले बंद-
चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाले, एका पॉझीटीव्ह रूग्णामागे 15 हाय रिस्कमधील व 20 लो रिस्कमधील अशाप्रकारे 35 नागरिकांची तपासणी करावी. जेणेकरून कोरोना संसर्ग थांबविणे शक्य होईल. त्याचप्रमाणे सुपर स्प्रेडर असलेले दुकानदार, भाजीपाला विक्रेते तसेच ज्यांना लोक जास्त भेटतात त्यांच्या 100 टक्के तपासण्या बंधनकारकरित्या कराव्यात. अशा सुपर स्प्रेडरची महिन्यातून दोनवेळा तपासणी करावी. सध्या पॉझीटीव्ह रूग्णांना होम आयसोलेशन दिल्या जाते. ही सुविधा बंद करण्यात यावी. कारण असे रूग्ण बाहेर फिरतांना आढळतात. त्यांच्यामुळेही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे ज्यांच्याकडे आयसोलेशनची पुर्ण व्यवस्था आहे, त्यांनाच होम आयसोलेशन द्यावे. अन्यथा ही सुविधा देवू नये.तालुका स्तरावरील यंत्रणांनी समन्वय ठेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावे. तालुका स्तरावर कोविड केअर सेंटर सुरू आहेत. तरी पॉझीटीव्ह रूग्णांना आधी कोविड केअर सेंटर येथे दाखल करावे. कोविड केअर सेंटरमधील मनुष्यबळाला कन्ट्युनेशन द्यावे. दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांची प्राधान्याने तपासणी करण्यात यावी.
पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची करण्यात येणार कोरोना टेस्ट-
मलकापूर तालुक्यात पॉझीटीव्ह व मृत्यू दर जास्त आहे. तेथील यंत्रणांनी गांभीर्याने घेत कोरोना संसर्ग रोखावा. शहरात कुठेही हॉटस्पॉट होवू देवू नये. पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णांची यादी तयार ठेवून त्यांच्या कुटूंबीय, कॉन्टॅक्टमधील नागरिकांची कोरोना चाचणी करावी. अशाचप्रकारे चिखली, खामगांव आदी ठिकाणीसुद्धा कारवाई करावी. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही आवश्यक त्या सुचना दिल्या. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक आदींसह संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीचे सादरीकरण अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी, तर आभार माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गोफणे यांनी मानले.कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी पॉझीटीव्ह रूग्णाच्या हाय व लो रिस्क संपर्कातील सर्वांची कोरोना तपासणी करावी. त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे, व आरटीपीसीआर व रॅपिड चाचण्यांवर भर देण्याचे सांगत पॉझीटीव्ह रूग्ण असलेल्या गावांमध्ये मोबाईल टेस्टींग युनीट सुरू करावे.अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज मंगळवारी दिल्या.
शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा-
अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड / किल्ल्यांवर जावून तारखेनुसार 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येवून शिवजयंती साजरी करतात. मात्र संसर्गजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करावा. कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येवू नये. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. अशा ठिकाणी 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक आदींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवू नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरीया, डेंग्यू आजार व त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. या ठिकाणी सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे व सॅनीटाईज करणे आदींचे पालन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने व स्थानिक प्रशासनाने विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे.
Last Updated : Feb 16, 2021, 10:06 PM IST