महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आदिवासी बहुल भाग असून या तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांना झोडपले आहे. यामध्ये येथील शेतकऱ्यांनी मागील पंधरा दिवसांपासून सरकारकडे विविध निवेदने देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशाराही चाचणी प्रशासनाला दिला होता.

बुलडाणा

By

Published : Nov 5, 2019, 5:36 PM IST

बुलडाणा- ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रशासकीय मदत एकरी २५ हजार रुपये द्यावे, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील तहसील कार्यालयात काही शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

संग्रामपूर तहसील कार्यालयात शेतकऱयांचे ठिय्या आंदोलन

हेही वाचा -अवकाळी पॅकेजही ठरणार बोलाची कढी अन् बोलाचा भात

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आदिवासी बहुल भाग असून या तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांना झोडपले आहे. यामध्ये येथील शेतकऱ्यांनी मागील पंधरा दिवसांपासून सरकारकडे विविध निवेदने देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशाराही चाचणी प्रशासनाला दिला होता. यानंतर आज (मंगळवार) शेतकरी अभय मारोडे यांच्या नेतृत्वाखाली काही शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या कक्षात अनोख्या पद्धतीचे हलका अंगावर चिटकवून या आंदोलनाला सुरुवात केली.

हेही वाचा -'माझा आमदार माझा मुख्यमंत्री' मातोश्रीबाहेर फलक

या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. जोपर्यंत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपये प्रत्येक प्रमाणे मदत मिळत नाही व त्यांच्या इतर मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती शेतकरी मारोडे यांनी दिली.

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या -

  • ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना प्रशासकीय मदत एकरी २५ हजार रुपये द्यावे
  • ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा नाही काढला त्यांनापण हाच लाभ देण्यात यावा
  • पीक विमा व प्रशासकीय मदत हा वेगवेगळा विषय आहे, हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावे
  • पीक विमा व प्रशासकीय मदत देताना कुठल्याही कागदपत्रांची अट ठेवू नये
  • सर्व शेतकऱ्यांना ही पीक विम्याची व प्रशासकीय मदत तात्काळ त्यांच्या खात्यात वर्ग करावी

ABOUT THE AUTHOR

...view details