बुलडाणा- जिल्ह्यात भाजपच्या एका महिला आमदारांनी अजान सुरू होताच आपले भाषण थांबवून अजानचा सन्मान केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वधर्म समभावचा संदेश भाजपच्या या महिला आमदारांनी दिला आहे. चिखली मतदार संघाचे आमदार श्वेता महाले-पाटील, असे त्या आमदाराचे नाव आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी चिखलीत सोमवारी (दि. 25) आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषण देताना शेजारी असणाऱ्या मशीदीत अजान सुरू झाली. अजानचे आवाज कानावर पडताच आमदार श्वेता महाले यांनी काही वेळ आपले भाषण थांबवून अजानचा सन्मान केला. या संपूर्ण प्रकाराने उपस्थितांची मने जिंकून त्यांनी सर्वधर्म समभावचा संदेश दिला आहे.
अजान सुरू होताच भाजप आमदारांनी भाषण थांबवून केला अजानचा सन्मान - अजान
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी या प्रमुख मागणीसाठी चिखलीचे आमदार श्वेता महाले-पाटील यांनी आसूड मोर्चा काढला. यावेळी भाषण देताना त्यांच्या कानावर अजानचे आवाज आले. त्यामुळे त्यांनी अजान होईपर्यंत आपले भाषण बंद ठेवत सर्वधर्म समभावचा संदेश दिला.
छायाचित्र
या केल्या मागण्या
- चिखली विधानसभेतील शेतकऱ्यांना घोषणा केल्याप्रमाणे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 25 हजार रुपये व बागायती शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये मदत तात्काळ घोषित करावी.
- ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
- पिक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम थेट त्यांच्या खात्यात मिळावी.
- कृषी पंपांना दिवसा किमान 10 तास वीजपुरवठा करावा.
- शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये मतदानाचा अधिकार द्यावा.
- नादुरुस्त ट्रान्सफार्मरची दोन दिवसांत दुरुस्ती व्हावी.
- शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.
- कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा.
हेही वाचा -दोन दिवसांत ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा स्वाभिमानीचे तीव्र आंदोलन -रविकांत तुपकर
Last Updated : Oct 25, 2021, 5:03 PM IST