महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा - अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

सोमनाथ हाके असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुलडाणा

By

Published : Mar 5, 2019, 2:00 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोथळी शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. सोमनाथ हाके असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी शेतकरी

दरम्यान, हाके यांचे शेत सहस्त्रमुळी येथील कोथळी शिवारात आहे. त्यांच्या शेतात कापूस वेचणीचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतात अनेक मजूर काम करत होते. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हाके मजुरांसाठी पिण्याचे पाणी आणण्याकरता शेतातील विहिरीवर गेले होते. त्याचवेळी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या शेतातील मजूर मदतीसाठी धावले. त्यामुळे अस्वलाने तेथून पळ काढला. जखमी अवस्थेतच हाके यांना मोताळा व त्यानंतर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हाके यांच्यावर हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरुन पळालेले अस्वल शेजारच्या केळीच्या शेतात लपून बसले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली आहे.
या घटनेनंतर मोताळाचे वनसंरक्षक कोंडावार आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी बुलडाणा येथून रेस्क्यू टीमला बोलावून घेतले. या टीमचे सदस्य राहुल चौहान, सुधीर जगताप, संदीप मडावी, देविदास वाघ यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता अस्वल केळीच्या शेतात लपून बसलेले त्यांना आढळले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details