बुलडाणा - शेतातून गेलेल्या विद्युत तारेत शॉट सर्किट झाल्याने नांद्राकोळी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील एक एकर ऊस व तीन एकरात लावलेले ठिंबक पूर्णपणे जळून खाक झाले झाल्याची घटना शनिवारी (८ मे) सकाळी घडली. त्यामुळे शेतकऱ्याचे जवळपास 6 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी येथील शेतकरी डिगंबर राऊत यांनी आपल्याकडील चार एकर शेतीपैकी तीन एकरात उसाची लागवड केली होती, आता आहे ऊस काढणीला आला होता. मात्र आज शनिवारी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास शेतातून गेलेल्या विद्युत तारेवर शॉटसर्किट झाल्याने शेतातील उभ्या असलेल्या ऊसाला आग लागली या आगीत साडे तीन लाखाचे एक एकरातील ऊस व दोन लाखाचे तीन एकरात केलेले ठिंबक जळून खाक झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याचा मुलगा योगेश डिंगबर राऊत यांनी केली आहे.