महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वेतनवाढीच्या मागणीसाठी 'आशा वर्कर' व 'गटप्रवर्तक' महिलांचे आंदोलन - आशा वर्कर व गटप्रवर्तक आंदोलन

बुलडाण्यात आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांतर्फे तोंडाला काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी खांमगावासह सर्मव ठिकाणच्या स्थानिक महिलांनी आंदोलनात सहभाग घेतला.

बुलडाण्यात आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांतर्फे तोंडाला काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले

By

Published : Sep 17, 2019, 7:46 AM IST

Updated : Sep 17, 2019, 7:24 PM IST

बुलडाणा - राज्यातील ७० हजार आशा वर्कर आणि १३ हजार गटप्रवर्तकांचा गेल्या ३ सप्टेंबरपासून बेमूदत संप सुरू आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून सोमवारी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांनी तोंडाला काळ्या फिती लावून आंदोलन केले.

वाशिममध्ये पात्र लाभार्थ्यांना शेतजमीन मिळत नसल्याने बेमूदत उपोषण सुरू

गेल्या अनेक वर्षांपासून आशा वर्कर आणि हजारो गटप्रवर्तक सरकारी कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मात्र, त्यांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत असल्याने वेतनावाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मात्र, आद्यापही या आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे आशा वर्कर यांना दरमहा १० हजार रुपये तसेच गट प्रवर्तकांना दरमहा २० हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मागण्यासांठी त्यांनी ३ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.

बुलडाण्यात आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांतर्फे तोंडाला काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले

अकोल्यात आशा वर्कर्सचे मूक आंदोलन

दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांनी तोंडाला काळ्या फिती लावून आंदोलन केले. यावेळी बुलडाणा व खांमगावासह संपूर्ण जिल्ह्यातील शेकडो महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

Last Updated : Sep 17, 2019, 7:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details