बुलडाणा - चिखली तालुक्यातील शेलसूर येथून जवळच असलेल्या धोत्रा भनगोजी परिसरात एका शेतकऱ्यांच्या शेतातील चाळीस क्विंटल तुरीची सुडी अज्ञाताने पटवल्याची घटना उघडकीस आली आहे.अज्ञाताकडून सुडी पेटवल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात बुधवारी 31 मार्च रोजी अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
रात्रीच्या सुमारास 10 एकर मधील तुरीच्या सुडया पेटवल्या
अज्ञाताने चाळीस क्विंटल तुरीची सुडी पेटविली
चिखली तालुक्यातील शेलसूर येथून जवळच असलेल्या धोत्रा भनगोजी परिसरात एका शेतकऱ्यांच्या शेतातील चाळीस क्विंटल तुरीची सुडी अज्ञाताने पटवल्याची घटना उघडकीस आली आहे.अज्ञाताकडून सुडी पेटवल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
धोत्रा भनगोजी येथील रामेश्वर काळे यांची गट नं. 45 मध्ये दहा एकरामध्ये तूर लावली होती. या तुरीची सुडी अज्ञात आरोपीने पेटवून दिल्याची घटना मंगळवारी 29 मार्च रोजी रात्री उघडकीस आली. होळीच्या दुसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास अज्ञाताने सुडी पेटवून दिली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी रामेश्वर काळे यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून अज्ञाताविरुध्द पोलिसांनी गुन्हा केला आहे. पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहे.
TAGGED:
बुलडाणा