बुलडाणा - बनावट कागदपत्रांद्वारे शेगाव रोडवरील प्लॉट दुसऱ्याच्या नावे करून सिव्हील लाईन भागातील व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. विलाससिंह राजपूत, असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने ३ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटची परस्पर विक्री; ३ जणांविरोधात गुन्हा दाखल - प्लॉट विक्री
बनावट कागदपत्रांद्वारे शेगाव रोडवरील प्लॉटची परस्पर विक्री केल्यामुळे पोलिसांनी ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
राजपूत (६५) यांच्या मालकीचा शेगाव रोडवर एक प्लॉट आहे. महादेव पाचपोर (रा. माक्ता कोक्ता) डॉ. प्रदीप सोनटक्के आणि तहसील कार्यालयातील तलाठी चोपडे यांनी संगनमत करून या प्लॉटची बनावट कागदपत्रे तयार केली. यासर्वांनी मिळून २३ नोव्हेंबर २०१७ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात पाचपोर आणि सोनटक्के यांच्या नावे हा प्लॉट करून तो हडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजपूत यांनी याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी सोनटक्के, तहसील कार्यालयातील तलाठी चोपडे आणि पाचपोर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.