बुलडाणा - पावसाळा संपला तरी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरूच आहे. बुलडाणा जिल्ह्यातही मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व 19 दरवाजे शनिवारी दुपारी उघडण्यात आले.
खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व 19 दरवाजे उघडले, नागपूर-पुणे महामार्ग बंद - खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले
बुलडाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व 19 दरवाजे शनिवारी दुपारी उघडण्यात आले.
खडकपूर्णा प्रकल्प
हेही वाचा - पुणे विभागातील 1 लाख 40 हजार हेक्टर शेतीचे नुकसान, त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश
खडकपूर्णा प्रकल्पातून 80 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून खडकपूर्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे नागपूर-पुणे महामार्ग बंद झाला आहे. महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद झाल्याने वाहनांची कोंडी झाली आहे. दरम्यान,खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडल्याने परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.