महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषीमंत्र्यांचा दौरा म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार - आमदार आकाश फुंडकर - dada bhuse latest news

कृषीमंत्र्यांच्या दौऱ्यातील 'भेटी' ऐनवेळी रद्द करण्यात आल्या. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असता या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे.

आमदार फुंडकर
आमदार फुंडकर

By

Published : Aug 29, 2020, 7:26 PM IST

बुलडाणा - आज (शनिवारी) राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे बुलडाणा दौऱ्यावर आले होते. मात्र, या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रकल्पांना ठिकठिकाणी भेटीचे असलेले नियोजन रद्द केल्याने हा दौरा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार असल्याचा आरोप, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी केला आहे.

आमदार फुंडकर यांची प्रतिक्रिया
कृषीमंत्री दादा भुसे हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, ते शेतकऱ्यांच्या पोक्रा अंतर्गत राबिविण्यात येत असलेल्या बाबी, क्रॉपसॅप अंतर्गत कपाशी प्लँट आणि शेतकरी उत्पादक प्रकल्पांना भेटी देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार होते. मात्र हे सर्व रद्द करण्यात आले असून फक्त जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक ठेवण्यात आली. यामुळे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा दौरा फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीका आकाश फुंडकर यांनी केली आहे. तसेच सरकारचा या कृतीचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत खामगाव येथे आमदार फुडकरांनी कृषीमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details