महाराष्ट्र

maharashtra

नारायण राणे आणि राम कदमांच्या 'त्या' वक्तव्यांना कृषिमंत्र्यांनी दिले उत्तर, म्हणाले..

By

Published : Aug 30, 2020, 11:55 AM IST

कृषिमंत्री दादा भुसे हे शेतकऱ्यासंबधी आढावा बैठक घेण्यासाठी शनिवारी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते. आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी खासदार नारायण राणे आणि आमदार राम कदम यांच्या विधानांना प्रत्युत्तर दिले.

बुलडाणा
बुलडाणा

बुलडाणा -सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात राज्याच्या मंत्रिमंडळातील एक मोठा मंत्री सहभागी असून लवकरच तपासातून ते निष्पन्न होईल, असे म्हणत खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. यावर कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी प्रतिक्रिया देताना, कोणी सुर्याकडे तोंड करून थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी स्वत:च्या चेहऱ्यावर येत असते, असे म्हणत त्यांना फटकारले आहे.

बुलडाणा

नारायण राणे यांचा इतिहास, भूगोल सर्वांना माहिती आहे. कोणी सुर्याकडे तोंड करून थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी स्वत:च्या चेहऱ्यावर येत असते. निष्कलंक, स्वच्छ चारित्र्याच्या लोकांवर खोटे आरोप करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला नीती, काळ, वेळ धडा शिकवत असते, असे मंत्री भुसे म्हणाले. कृषिमंत्री दादा भुसे हे शेतकऱ्यासंबधी आढावा बैठक घेण्यासाठी शनिवारी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते. आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा -'सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी भाजप कनेक्शनची चौकशी करणार'

शनिवारी मंदिरे उघडण्यासाठी संपूर्ण राज्यभर भाजपकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेने हिंदुत्वाला सोडले आहे, असे विधान भाजप आमदार राम कदम यांनी केले होते. त्यावर राम कदम यांचे चारित्र्य सर्वांना माहिती आहे. जे मुलींना पळवून आणण्याची भाषा करतात त्यांना देवाच्या बाबतीत बोलण्याचा काहीच अधिकार नाही, असा टोला मंत्री भुसे यांनी कदम यांना लगावला. यावेळी त्यांच्यासोबत बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमूलकर, माजी आमदार शशिकांत खेडेकर, जालिंदर बुधवत यांच्यासह असंख्य शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details