महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकर्‍यांची खत विक्री दरात फसवणूक होऊ नये, यासाठी खतांच्या किमती जाहीर

यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त भावाने खते मिळावीत, त्यांची फसवणूक होवू नये, यासाठी खतांच्या प्रति बॅग किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. याच किंमतीला शेतकऱ्यांना खत विक्री करावी. तसेच शेतकऱ्यांनी याच किंमतीला खत खरेदी करावे. कुठलाही गैरप्रकार आढळल्यास नजिकच्या तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती, कृषि अधिकारी यांना अवगत करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे वतीने करण्यात आले आहे.

kharip season
शेतकर्‍यांची खत विक्री दरात फसवणूक होऊ नये, यासाठी खतांच्या किमती जाहीर

By

Published : May 29, 2020, 7:51 AM IST

बुलडाणा- शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी तयारी पूर्ण होत आली आहे. तर मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त भावाने खते मिळावीत, त्यांची फसवणूक होवू नये, यासाठी खतांच्या प्रति बॅग किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. याच किंमतीला शेतकऱ्यांना खत विक्री करावी. तसेच शेतकऱ्यांनी याच किंमतीला खत खरेदी करावे. कुठलाही गैरप्रकार आढळल्यास नजिकच्या तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती, कृषि अधिकारी यांना अवगत करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे वतीने करण्यात आले आहे.

खताचे कंपनीनुसार प्रती बॅग दर :

कंपनी जीएसएफसी : ग्रेड 20.20.0.13 - किंमत प्रति बॅग 975, ग्रेड 10.26.26 – प्रति बॅग 1175, ग्रेड 12.32.16 – प्रति बॅग 1185, डिएपी - प्रति बॅग 1200, कंपनी कोरोमंडल : ग्रेड डीएपी – 1250, ग्रेड 10.26.26- प्रति बॅग्‍ 1185, ग्रेड एमओपी – प्रति बॅग 950, ग्रेड 20.20.0.13- प्रति बॅग 1000, कंपनी स्मार्टटेक : ग्रेड 20.20.0.13- प्रति बॅग 1065, ग्रेड 10.26.26- प्रति बॅग 1295, कंपनी आयपीएल : ग्रेड डीएपी- प्रति बॅग 1225, ग्रेड एमओपी – प्रति बॅग 950, ग्रेड 16.16.16 – प्रति बॅग 1075, कंपनी आरसीएफ : ग्रेड युरीया – प्रति बॅग 266.50, ग्रेड 15.15.15- प्रति बॅग 1060, कंपनी इफको : ग्रेड 10.26.26 - प्रति बॅग 1200, ग्रेड 12.32.16- प्रति बॅग 1185, ग्रेड 20.20.0.13- प्रति बॅग 975 रुपये, कंपनी झुआरी : ग्रेड डिएपी - प्रति बॅग 1255 रूपये, कंपनी जीएनव्हीएफसी : ग्रेड 20.20.0- प्रति बॅग 950.

ABOUT THE AUTHOR

...view details