महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाणी द्या.. नाहीतर खुर्च्या खाली करा, निमगावकरांचे ग्रामपंयाचतीवर आंदोलन - budana

ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी गावातून रॅली काढत ग्रामपंचायतने पाण्याचे नियोजन करावे. नियमित पाणी पुरवठा करावा, अन्यथा खुर्च्या खाली कराव्या असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

पाण्यासाठी निमगावकरांनी रॅली काढली

By

Published : May 2, 2019, 10:48 AM IST

बुलडाणा - संपूर्ण राज्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून, नागरिकांना पाण्यासाठी कोसो दूर भटकंती करावी लागत आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील निमगाव येथील ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कामकाजामुळे पाण्याचे स्रोत उपलब्ध असून देखील ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी गावातून रॅली काढत पाण्याचे नियोजन करा. अन्यथा खुर्च्या खाली करा, असा इशारा दिला आहे.

निमगावच्या नागरिकांनी आपल्या समस्या ईटीव्ही भारतला सांगितल्या

नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पूर्वी सात ते आठ दिवसांनी मिळणारे पाणी आता वीस ते पंचवीस दिवसांनी मिळत आहे. ग्रामपंचायतकडे पाण्याचे स्रोत उपलब्ध असून चार बोअर अधिग्रहित केले आहेत. परंतु ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी मिळतच नसल्याचे खुद्द ग्रामपंचायत सदस्यांनीच तहसीलदारांना निवेदनातून सांगितले आहे.

ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी गावातून रॅली काढत ग्रामपंचायतने पाण्याचे नियोजन करावे. नियमित पाणी पुरवठा करावा, अन्यथा खुर्च्या खाली कराव्या असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details