बुलडाणा - जिल्ह्यात सर्वाधिक 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) 17 फेब्रुवारीला जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. ही परिस्थिती पाहता आजच्या आदेशाने शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. तसेच शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचं वाढतं संकट; बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू - again lockdown in buldana latest news
शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदीचे आदेश पारित करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे.
संचारबंदी लागू -
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष शंकर रामामुर्ती यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, शासन आदेश दिनांक 29/01/2021 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) मधील तरतुदीनुसार कोविड-19 चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता सामाजिक अंतर व इतर आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करून बुलडाणा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदी लागू केली आहे.
हेही वाचा -महागाईचा 'कळस': नऊ दिवसात पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महाग
आदेशातील प्रमुख बाबी काय?
1. शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदीचे आदेश पारित करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे.
2. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ ५० व्यक्तिंनाच परवानगी असेल. मिरवणूक आणि रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
3. लग्नसमारंभाकरिता केवळ 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. लग्नसमारंभाकरिता रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगी असेल. याबाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी.
4. लग्न समारंभाच्या नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी.