बुलडाणा : सरकारी कर्मचारी पगारावर अवलंबून असतो का? त्यांचे पैसे घरात ठेवायला जागा नाही. 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर उत्पन्न असल्याचे वादग्रस्त विधान शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर वाद होण्याची होण्याची शक्यता आहे. जुन्या पेन्शनसाठी सध्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
पेन्शनची काय गरज? : संजय गायकवाड म्हणाले की, सरकारी कर्मचारी बाहेरून पैसे कमवतात, त्यांना पेन्शनची काय गरज? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारी कर्मचारी 8 तास काम करतात, आमदार 24 तास उपलब्ध आहेत, आमदार व्हायला 30 वर्षे गेली, आमचा पगार 1 लाख 82 हजार. मात्र, आमचा खर्च महिन्याला 5 लाख असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना आला माज :संजय गायकवाड म्हणाले की, आमदार डिझेलवर लाखो रुपये खर्च करतात. हे सरकारी कर्मचारी आहेत. शेतकरी त्याच्याकडे कामे घेऊन जातात मात्र, ६ महिने कोणी काम करत नाही. त्यांच्याकडे शेतकरी विषाच्या बाटल्या घेऊन जात असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर केला आहे. सरकारी कर्मचारी इतका मदमस्त झाला की त्याला पैशांशिवाय काही दिसत नाही. टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय ते फाईलला हात लावत नाही. अधी तुम्ही जनतेची योग्य कामे करा मग तुमच्या पेन्शनचा विचार होईल अशी प्रतिक्रिया त्यानी दिली आहे. मात्र, नंतर त्यांनी सर्व कर्मचाऱ्यासंदर्भात विधान केले नाही. त्यामुळे सराकार कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. ज्यानी भ्रष्टचार केला त्यांच्या संदर्भात मी असे वक्तव्य केल्याचे ते म्हणाले.
पगारावर कोणता कर्मचारी अवलंबून : संजय गायकवाड म्हणाले की, 95 टक्के कर्मचार्यांची बाहेरून बेकायदेशीर मिळकत असून, ते त्यांची संपत्ती घरात ठेवत नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा पगार आहे. सरकारी पगारावर कोणत्या कर्मचाऱ्याचे भागत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारी कर्मचारी इतकी उधळपट्टी करतात की सांगायचे काम नाही. साधे कार्यालयत कोणी काम घेऊन गेले तर पैशाशिवाय काम होत नाही, असे वादग्रस्त विधान गायकवाड यांनी केले आहे.
MLA Sanjay Gaikwad : सरकारी कर्मचाऱ्यांना माज; शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान - Controversial statement of MLA Sanjay Gaikwad
सरकारी कर्मचारी बाहेरून पैसे कमावतात, त्यांना पेन्शनची काय गरज? असा सवाल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला. सरकारी कर्मचारी 8 तास काम करतात, आमदार 24 तास काम करतात, आमदार व्हायला 30 वर्षे लागली. आमचा पगार 1 लाख 82 हजार आहे. मात्र आमचा मासिक खर्च ५ लाख असल्याचे त्यांनी सांगितले.
MLA Sanjay Gaikwad