महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात एका 70 वर्षीय कोरोनाग्रस्त संशयिताचा मृत्यू... - बुलडाणा कोरोना

25 फेब्रुवारीला बुलडाण्यातील 70 वर्षीय व्यक्ती हजच्या यात्रेला गेला होता. यात्रा करुन तो व्यक्ती 13 मार्चला भारतात परतला. त्यानंतर तो मुंबईहून बुलडाण्यात आला. त्यानंतर कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.

70-year-old-corona-suspect-dies-in-buldana
बुलडाण्यात एका 70 वर्षीय कोरोनाग्रस्त संशयिताचा मृत्यू...

By

Published : Mar 14, 2020, 5:29 PM IST

Updated : Mar 14, 2020, 5:55 PM IST

बुलडाणा- हज यात्रा करुन आलेल्या एका 70 वर्षीय व्यक्तीमध्ये कोरोणाची लक्षणे आढळली होती. त्यानंतर शहरातील शासकीय रुग्णालयात त्याच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र, त्यास कोरोनाची बाधा होती का याबाबतचा अहवाल अध्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू कोरोना विषाणूमुळेच झाला का याबाबतचे स्पष्टीकरण अद्याप पुढे आले नाही.

बुलडाण्यात एका 70 वर्षीय कोरोनाग्रस्त संशयिताचा मृत्यू...

हेही वाचा-कोरोनाचा धसका : बिहारमधील शिवहर जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू

25 फेब्रुवारीला बुलडाण्यातील 70 वर्षीय व्यक्ती हजच्या यात्रेला गेला होता. यात्रा करुन तो व्यक्ती 13 मार्चला भारतात परतला. त्यानंतर तो मुंबईहून बुलडाण्यात आला. त्यानंतर कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र, उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या संशयित रुग्णाचा वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. त्या अहवालानंतर त्याला कोरोनाची लागन झाली होती का नाही? याची माहिती मिळणार आहे.

Last Updated : Mar 14, 2020, 5:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details