बुलडाणा- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हाने वाढत आहेत. अशात आता जिल्ह्यात आणखी 3 रुग्णांची भर पडली आहे. शेगांवमध्ये 2 तर खामगावमध्ये 1 असे एकूण तीन रुग्ण आढळले आहेत.
बुलडाण्यात आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 15 वर
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या 44 लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामधून 21 नमुने निगेटिव्ह आले. तर, बुधवारी 8 एप्रिलला आलेल्या 10 अहवालामध्ये 7 निगेटिव्ह आले असून 3 पॉझिटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या 44 लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामधून 21 नमुने निगेटिव्ह आले. तर, बुधवारी 8 एप्रिलला आलेल्या 10 अहवालामध्ये 7 निगेटिव्ह आले असून 3 पॉझिटीव्ह आले आहेत. आता बुलडाण्यात 5 , शेगांवमध्ये 3 , खामगावमध्ये 2 , चिखलीमध्ये 3 , सिंदखेडराजा आणि देऊळगावराजामध्ये 1-1 असे एकूण 15 रुग्ण जिल्ह्यात आहेत.