महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Accident on Samruddhi Highway in Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये अपघात; 3 ठार 2 जखमी

बुलडाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील शिवनापिसा गावाजवळ दोन कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातात 3 जण ठार तर 2 जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Buldhana Car Accident
समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये अपघात

By

Published : Jan 16, 2023, 7:43 PM IST

बुलडाणा :जिल्ह्यात भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील शिवनापिसा या गावाजवळ उभे असलेल्या कारला पाठीमागून जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना मेहकर येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. हा अपघात 16 जानेवारीच्या सकाळी घडला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने समृद्धी मार्गावरून हटविण्यात आली आहेत.


तीन जण जागीच ठार : आज 16 जानेवारी 2023 रोजी सकाळी समृद्धी महामार्गावरील मेहकर जालना रोडवर एका कारने दुसऱ्या कारला मागून धडक दिल्याने 3 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असल्याचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नागपूरच्या दिशेने जाताना अपघात : मिळालेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी 2023 रोजी सकाळी समृद्धी महामार्गावर औरंगाबादहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या दोन कारचा अपघात झाला आहे. याचदरम्यान समृद्धी महामार्गावर बीबी ते शिवनापिसा गावाजवळ स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच 49 बीआर 6082, मेहकरपासून काही अंतरावर पुढे जात असताना मारुती सुझुकी कार क्रमांक MH32C 4490 या कारमध्ये तीन जण स्वार होते. या दोन्ही गाड्यांचा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा मृत्यू रूग्णालयात उपचार घेत असताना झाला.

जखमींवर उपचार सुरू : अपघातानंतर तत्काळ महामार्ग पोलीस पीएसआय गजानन उज्जैनकर, गोविंदा उबरहंडे, हरी ओम काकडे, विठ्ठल काळुसे, संदीप किरके, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान नितीन पवार, जयकुमार राठोड, क्यूआरटी कर्मचारी अविनाश मकासरे, रुस्तुम कुट्टे, कैलास जखमी रुग्णवाहिकेच्या 108 क्रमांकाच्या डॉ. दिगंबर शिंदे यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींवर मेहकरच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :Nagpur Crime News : पोटच्या मुलांना विष देऊन निर्दयी बापाने केली आत्महत्या; मुलीचा मृत्यू तर मुलावर उपचार सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details