बुलडाणा- जिल्ह्यातील बोथा-काजी या गावातील सुरेश गावडे या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीमधील गाळ काढताना दिड फूट लांबीचा म्हणजे २० नंबरचा बूट सापडला आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे बुटांच्या दुप्पट आकाराचा हा बूट कोण वापरत असावे? याबाबत विविध चर्चांना शहरात उधाण आले आहे.
अबब.. बुलडाण्यातील बोथा-काजी गावात सापडला चक्क 20 नंबरचा 'महाबूट' - बूट
जिल्ह्यातील बोथा-काजी या गावातील सुरेश गावडे या शेतकऱ्याच्या शेतीतील विहितील गाळ काढताना दिढ फूट लांबीचा म्हणजे २० नंबरचा नंबरचा बूट सापडला आहे.
आत्तापर्यंत आपण जास्तीत-जास्त १२ नंबरचे बूट किंवा चपला पाहिल्या आहेत. बाजारात किंवा दुकानात १२ नंबर पेक्षा मोठ्या नंबरच्या बूट किंवा चपला उपलब्ध नाहीत. कारण चपला किंव बूट कंपन्या एवढ्या मोठ्या नंबरचे बूट तयारच करत नाहीत. शिवाय एवढे मोठे पाय कोणाचे नसतातही. मात्र, यापेक्षा दुप्पट म्हणजे २० नंबरचा बूट सापडल्याने तो माणूस कसा असेल? तो कसा दिसत असेस? त्याचा पाय केवढा असेल? अशी कल्पना सध्या बुलडाण्यातील नागरिक करत आहेत.
विहिरीतील गाळ काढताना सापडलेला हा बूट पाहून सगळेचजण आश्चर्यचकीत झाले आहेत. या दीड फुटाच्या बुटासमोर सामान्य माणसाचा बूट अगदीच छोटा दिसतो. या बुटाबाबत आम्ही बुलढाण्यातल्या विक्रेत्यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी गेल्या चाळीस वर्षात एवढ्या मोठ्या नंबरच्या बुटाची विक्री केली नसल्याचे सांगितले.