बुलडाणा- लोणार तालुक्यातील दोघे जण ३ दिवसांपूर्वी आलेल्या नदीच्या पुरात वाहून गेले होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. मात्र, आज या दोघांचाही मृतदेह चोरपांग्रा तलावात सापडला आहे. रवी गायकवाड आणि नारायण गायकवाड अशी मृतांची नावे आहेत.
लोणार तालुक्यातील बीबी गाव परिसरात १ नोव्हेंबरच्या रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तालुका परिसरातील नदीला पूर आला होता. दरम्यान, सिंधखेडराजा तालुक्यातील देऊळगाव कोळे येथील एस.टी महामंडळ वाहक रवी गायकवाड आणि आडत चालक नारायण गायकवाड हे मोटारसायकलवरून जात असताना ते बीबी गावालगत असलेल्या पुलावरून गेले. मात्र, पुलावरून जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही मोटरसायकलसह वाहून गेले होते.