बुलडाणा- जिल्ह्यातील मलकापूर येथे नॅशनल हायवे क्रमांक ६ वर भरधाव कंटेनरचा टायर फुटल्याने, कंटेनरने एका प्रवासी टाटा मॅजिकवर जाऊन आदळला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
बुलडाण्यात काळा सोमवारः कंटेनर आणि प्रवासी टाटा मॅजिकचा भीषण अपघात; १३ जण ठार - कंटनेर
मलकापूर येथे नॅशनल हायवे क्रमांक ६ वर भरधाव कंटेनरचा टायर फुटल्याने, कंटेनरने एका प्रवासी टाटा मॅजिकवर जाऊन आदळला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
मलकापूर ते अनुराबाद येथे अवैध प्रवाशी वाहतुक केली जाते. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास टाटा मॅजिकने १५ प्रवाशी मलकापूरहून अनुराबादकडे निघाले होते. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मलकापूराजवळ असलेल्या रचना फॅक्टरी समोर नागपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कंटेनरचा टायर फुटल्याने हा कंटेनर टाटा मॅजिकवर जाऊन आदळला.
या धडकेत टाटा मॅजिकमधील १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अन्य २ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.