महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेहकरच्या मादणी येथे आढळली १० जंगली बदके मृताअवस्थेत - बर्ड फ्लू

डोणगांव पासून जवळच असलेल्या ग्राम मादणी येथील धारणा जवळ प्रदीप भुजनागराव मेटांगळे यांच्या शेतात १० जंगली बदके मृत अवस्थेत आढळली.

१० जंगली बदके मृताअवस्थेत आढळली
१० जंगली बदके मृताअवस्थेत आढळली

By

Published : Jan 24, 2021, 4:07 PM IST

बुलडाणा -डोणगांव पासून जवळच असलेल्या ग्राम मादणी येथील धारणा जवळ प्रदीप भुजनागराव मेटांगळे यांच्या शेतात १० जंगली बदके मृत अवस्थेत आढळली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आज रविवारी (२४ जानेवारी) ही मृत बदके आढळली. याची माहिती पशुधन विभाग यांना कळताच यांनी शेतात येऊन मृत पक्ष्यांचा पंचनामा केला. त्यानंतर मृत बदकाचे नमुने घेतले असून पुण्याच्या लॅब मध्ये पाठवणार आहेत. अहवाल आल्यानंतर बदकाचा मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

पशुधन अधिकारी येई पर्यंत कुत्र्यांनी पडवली ६ बदके-

मुत माहिती गावकऱ्यांकडून पशुधन अधिकारी यांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बदकाची पाहणी केली. यावेळी बदकांच्या तोंडातून फेस येत होता. पशुधन अधिकारी येईपर्यंत कुत्र्यांनी त्या ठिकाणावरून ६ बदके पळविली होती. या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फक्त चारच बदके मिळून आली. तेव्हा बदकाचा मृत्यू कश्याने झाला याचा तपास लावण्यासाठी पशुधन अधिकारी बदकांचे नमूने अकोला येथील लॅब मार्फत पुणे येथे पाठवणार आहेत. बदकांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला की विषाने. हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.

घटनास्थळी मेहकर पशुधन अधिकारी न्यानेश्वर देशमुख, एस आर गायकवाड पशुधन पर्यवेक्षक हिवरा आश्रम, बोचरे परिचारक हे हजर होते. यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने खड्डा खोदून मृत पक्ष्याला गाडले.

हेही वाचा-जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही - शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details