बुलडाणा - चिखली तालुक्यातील डोंगर शेवलीवरुन दुचाकीने डोंगर खंडाळ्याकडे जात असतांनना दुचाकीवरून पडल्याने 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. मृताचे नाव भागवत सावळे असे आहे.
नियंत्रण सुटल्याने दुचाकी आदळली झाडाला -
चिखली तालुक्यातील ग्राम डोंगरशेवली येथील रहिवासी भागवत सावळे (34) हे शुक्रवारी काही कामानिमित्त दुचाकीने डोंगरखंडाळा या गावाकडे जात असतांना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. आणि दुचाकी रस्त्याच्या बाजुला असलेल्या एका झाडावर जावून आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना अगोदर डोंगरखंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने व रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
हेही वाचा - दुचाकी-चारचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू