महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खड्ड्यांमुळे तरुणाचा अपघाती मृत्यू, मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - भंडारा आंदोलन बातमी

रेल्वे फाटक ते शितलामाता मंदिर पर्यंतचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे. या रस्त्यावर रविवारी एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

young man dead due to pit on road, protest-in-bhandara
मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

By

Published : Feb 10, 2020, 4:44 PM IST

भंडारा- खड्ड्यांमुळे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. खराब रस्त्यांसाठी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी आणि मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन केले गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले. प्रशांत नवघरे असे मृत तरुणाचे नाव आहे.

मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

हेही वाचा-'पीएलजीए'मध्ये सामील व्हा; गोंदियात आढळले नक्षल्यांचे पत्रक

रेल्वे फाटक ते शितलामाता मंदिर पर्यंतचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे. हा रस्ता नव्याने बनत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेला आहे. मात्र, चोवीस मीटर रूंदीच्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने रस्ता लहान झाला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून तेवढ्याच भागात काम थांबविले गेले आहे. राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे नगरपालिका याकडे लक्ष देत नाही. तर नव्याने रस्ता बनवणार असल्यामुळे कंत्राटदार किंवा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी खड्ड्यांची डागडुजी सुद्धा करीत नाही. त्यामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे.

दरम्यान, याच रस्त्यावर रविवारी प्रशांत नवघरे या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे नागरिक चांगलेच संतापले होते. संतापलेल्या नागरिकांनी कुटुंबासह शवविच्छेदनानंतर सोमवारी सकाळी हा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला. त्याठिकाणी पोलीस अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. जिल्ह्याचे खासदार म्हणून सुनील मेंढे या अपघातासाठी जबाबदार आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि कंत्राटदार सुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना येथे बोलवावे अशी मागणी करत त्यांच्याविरुद्ध घोषणा देण्यात आल्या.

शेवटी जिल्हाधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर केंद्रांना आर्थिक मदतीसाठी निवेदन दिले जाईल. तसेच दोषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. आजच्या आज त्या खड्ड्यांची डागडुजी करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details