महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कामगार दिन विशेष : वीटभट्टी मजुरांना 'कामगार दिनच' नाही माहित

संपूर्ण महाराष्ट्रात आज कामगार दिन साजरा केला जात आहे. मात्र, ज्या कामगारांच्या नावाने हा दिन साजरा केला जातो. त्यांनाच या दिनाविषयी माहिती नाही.

By

Published : May 1, 2019, 6:22 PM IST

कामगार दिन विशेष : वीटभट्टी मजुरांना 'कामगार दिनच' नाही माहित

भंडारा- संपूर्ण महाराष्ट्रात आज कामगार दिन साजरा केला जात आहे. मात्र, ज्या कामगारांच्या नावाने हा दिन साजरा केला जातो. त्यांनाच या दिनाविषयी माहिती नाही. हे सर्व कामगार आज ही कामावर हजर होते. या कामगारांना याबाबत विचारले असता, पोट भरण्यासाठी कामे करावे लागते, घरी राहिल्यास नुकसान होते, असे त्यांनी सांगितले.

भंडारा जिल्ह्यांमध्ये सध्या सूर्यनारायण आग ओकत आहे. तापमान ४५ अंशापर्यंत पोहोचले आहे. मात्र, या रणरणत्या उन्हात वीटभट्टीवर काम करणारे मजूर कामगार दिनीही काम करत आहेत. या कामगारांना १ हजार विटा बनवल्यानंतर ६०० रुपये मिळतात. तर १ हजार विटा बनविण्यासाठी पती-पत्नीला १ दिवस लागतो. म्हणजे १ हजार विटामागे एका व्यक्तीला दिवसाला ३०० रुपये मिळतात. त्यामुळे थंडी असो किंवा उन्हाळा शक्य तेवढे जास्तीत जास्त काम करून पैसे मिळवण्यासाठी हे कामगार अहोरात्र कष्ट करतात.

कामगार दिन विशेष : वीटभट्टी मजुरांना 'कामगार दिनच' नाही माहित

कामगारांना याविषयी कामगार दिनाबाबत विचारले असता, त्यांनी याविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. काम बंद ठेवले, तर नुकसान होईल, त्यामुळेही कामावर आल्याचे कामगारांनी सांगितले. दिवसभर कठीण परिश्रम केल्यानंतरही मिळणारी रोजगार हा खूप कमी आहे. मात्र, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हाताला काम मिळते, याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या वीटभट्टीवर मागील ३ वर्षापासून प्रत्येक वर्षी ७ महिन्यांसाठी येथे येऊन राहतो आणि काम करतो, असे त्यांनी सांगितले.

कच्च्या विटा भट्टीत टाकून भाजल्या जातात. त्यामुळे या परिसरातील तापमान आणखी वाढते. त्याबरोबरच वीटभट्टीवर राहताना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचे कामगार सांगतात. या असंघटित कामगारांना काम करताना सुरक्षेच्या दृष्टीने या सुविधा मिळायला हव्यात. तसेच कामाच्या मोबदल्यात योग्य तो रोजगार मिळावा, यासाठी शासनाने पाऊले उचलण्याची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details