महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला दिन विशेष : ७०० रुपयांच्या स्टायपन्डवर बनली उद्योजिका, वर्षाला ४ लाखांचे उत्पन्न - महिला दिन विशेष

प्रशिक्षणात मिळालेल्या ७०० रुपयात त्यांनी बॅग बनवण्यासाठी लागणारे काही समान आणले. बॅग बनवण्याचे काम सुरू केले. कमी पैशांत लोकांना चांगल्या बॅग मिळत असल्याने हळू हळू त्यांचे काम वाढत गेले. आज त्या ३ ते ४ लाख रुपये वार्षिक उत्पन्न कमवतात.

सरिता बडवाईक

By

Published : Mar 8, 2019, 12:08 AM IST

Updated : Mar 8, 2019, 5:22 PM IST

भंडारा -बॅग तयार करण्याच्या प्रशिक्षणातून मिळालेल्या ७०० रुपयांच्या स्टायपन्डमधून जिल्ह्यातील एक शेतमजूर महिला यशस्वी उद्योजिका बनली आहे. त्यामधून वर्षाकाठी ३ ते ४ लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन सुखाने संसार चालवत आहे. एवढेच नाहीतर इतर महिलांना प्रशिक्षण देऊन उद्योजक बनण्याची प्रेरणा देत आहे.

महिला दिन विशेष


सरिता बडवाईक, असे या उद्योजिकेचे नाव आहे. जिल्ह्यातील मोहाडीच्या त्या रहिवासी आहे. आज त्या यशस्वी उद्योजिका असल्या तरी त्यांच्या भूतकाळाला शेतमजुरीची किनार होती. पती नोकरीवर असल्याने संसाराच्या सुरुवातीचे दिवस चांगले गेले. मात्र, काही वर्षातच पतीची नोकरी सुटली आणि त्यांच्या नशिबी शेतमजुरी आली. २००९ पर्यंत पतीचे सायकल दुरुस्तीचे लहानशे दुकान होते. सरिता या स्वतः शेतमजूर म्हणून काम करीत होत्या. मात्र, या तुटपुंज्या पैशात संसाराचा गाडा चालविणे कठीण जात होता. त्यामुळेच त्यांनी बॅग बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांना या प्रशिक्षणात ७०० रुपये स्टायपन्ड म्हणून मिळाले. याच ७०० रुपयांनी त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

प्रशिक्षणात मिळालेल्या ७०० रुपयात त्यांनी बॅग बनवण्यासाठी लागणारे काही समान आणले. बॅग बनवण्याचे काम सुरू केले. कमी पैशांत लोकांना चांगल्या बॅग मिळत असल्याने हळू हळू त्यांचे काम वाढत गेले. आज त्या ३ ते ४ लाख रुपये वार्षिक उत्पन्न कमवतात. त्यांच्या कामात त्यांचे पती आणि मुलीही मदत करतात. त्या प्रत्येक प्रकारच्या बॅग बनवीत असून मोडाडी परिसरात त्यांच्या बॅगला चांगली मागणी आहे. त्यांच्या तिन्ही मुली शिक्षण घेत आहेत.

सरितांनी संतोषी महिला बचत गटाची स्थापना करून महिलांना संघटित केले. त्यांनी अनेकांना प्रशिक्षणही दिले. त्यांचा व्यवसायाने आता एक नवी उंची गाठली असून स्वतःची आर्थिक प्रगती सुद्धा केली आहे. या व्यवसायातून त्यांनी अनेक तरुणी आणि महिलांना प्रशिक्षण दिले. त्यामधूनच अनेक उद्योजिका घडवण्याचे स्वप्न असल्याचे सरिता सांगतात.


Last Updated : Mar 8, 2019, 5:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details