भंडारा - मतदाराने केलेले मतदान गुप्त असावे, यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्नशील असते. मात्र, एका मतदाराने भंडारा-गोंदियात झालेल्या मतदानातील मतदान करतानाचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी संबधित प्रकरणाची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी तक्रार दिली आहे.
मतदाराने मतदान करतानाचा फोटो केला व्हायरल, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल
एका मतदाराने भंडारा-गोंदियात झालेल्या मतदानातील मतदान करतानाचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिलला मतदान पार पडले. येथील निवडणूक शांततेत पार पाडली. येथील सर्वांना २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतिक्षा आहे. मात्र, एका अतिउत्साही मतदाराने या ठिकाणी मतदान काढतानाचा फोटो व्हायरल केला आहे. त्यामुळे भविष्यात मतदान करताना मोबाईलवर बंदी येऊ शकते. या व्हायरल झालेल्या फोटोमुळे निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच फजिती झाली आहे.
फोटो काढून व्हायरल करणारा मतदार हा तुमसर तालुक्यातील आहे. त्याने काढलेल्या या फोटोत त्याने कोणाला मतदान केले हे स्पष्टपणे दिसत आहे.