महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मध्यप्रदेशातील 2 तरुणांना चोरीच्या गुन्ह्यात अटक; भंडारा गुन्हे शाखेची कारवाई - LCD TV

विशेष म्हणजे यापैकी एका आरोपीला चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री घनदाट जंगलात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रिन्स सोनगडे व पिंकेश बिटले असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

भंडारा

By

Published : Jul 27, 2019, 10:30 PM IST

भंडारा- तुमसर तालुक्यातील गोबरवाही गावात मोबाईल दुकान फोडून चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, एलसीडी, दुचाकीसह १ लाख २९ हजार ९६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे यापैकी एका आरोपीला चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री घनदाट जंगलात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रिन्स सोनगडे व पिंकेश बिटले असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मध्यप्रदेशातील 2 तरुणांना चोरीच्या गुन्ह्यात अटक; भंडारा गुन्हे शाखेची कारवाई

गोबरवाही गावातील कांचन टेलिकॉम सर्व्हिसेस या दुकानात २४ जूनला चोरी झाली होती. चोरट्यांनी रात्रीला दुकान फोडून दुकानातील मोबाईलसह इतर वस्तू चोरी केल्या होत्या. एक महिना उलटल्यानंतरही आरोपीचा शोध न लागल्याने हे प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे दिले.

स्थानिक गुन्हे शाखेने सायबर सेलची मदत घेत चोरी गेलेल्या मोबाईलचे लोकेशन शोधले असता मोबाईल मध्यप्रदेशातील एका व्यक्तीकडे असल्याचे समजले. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, तो मोबाईल त्याच्या भावांनी त्याला दिल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याच्या भावाला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी १९ वर्षीय प्रिन्स सोनगडे (रा. अर्जुनटोला ता. तिरोडी जि. बालाघाट) हा बीएससी द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी असून त्यानंतर तो गुन्हेगारी क्षेत्रात वळला. प्रथम याला अटक केल्यानंतर त्याने त्याचा साथीदार पिंकेश बिटले (रा. दयतबर्रा जि. बालाघाट) याच्यासह चोरी केल्याचे कबूल केले.

आरोपी पिंकेश बिटले याला अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस गेले असता, पिंकेशने त्यांना पिटेसूरच्या जंगलात मध्यरात्री तब्बल चार तास फिरवले, मात्र पोलिसांनी हार न मानता चार तासानंतर पिंकेशला अटक केली.

या दोन्ही आरोपीकडून चोरी केलेल्या मुद्देमालामध्ये ३१ मोबाईल हँडसेट, मोबाईल अॅक्सेसरीज, एलसीडी टीव्ही, कम्प्युटर मॉनिटर आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख २९ हजार ९६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करण्यात मदत मिळाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details