भंडारा- भंडारा-गोंदिया लोकसभेचा खासदार नेमका कोण असेल हे येणाऱ्या 23 मे ला स्पष्ट होईल. यावेळी खरी लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच आहे. या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांपैकी कोणीही निवडून येईल तरी विजयाचा जल्लोष हा प्रभाग क्रमांक 7 मध्येच होणार एवढे मात्र निश्चित आहे. कारण या निवडणुकीतील दोन्ही महत्वाच्या पक्षाचे उमेदवार याच प्रभागातील रहिवासी आहेत.
जिंकले तरी जल्लोष अन् हरले तरी जल्लोष; भंडारा-गोंदिया मतदारसंघातील दोन्ही उमेदवार राहतात एकाच प्रभागात - sunil mendhe
भाजपचे सुनिल मेंढे आणि राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्ये हे दोन्ही याच प्रभागात राहतात. 200 मीटरच्या आता या दोन्ही प्रमुख उमेदवारांचे घर आहेत.
भाजपचे सुनिल मेंढे आणि राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्ये हे दोन्ही याच प्रभागात राहतात. 200 मीटरच्या आता या दोन्ही प्रमुख उमेदवारांचे घर आहेत. आज या दोन्ही उमेदवारांना जिंकण्याची खात्री आहे. मात्र, विजयी कोण होणार हे 23 तारखेला पुढे येईल आणि विजयानंतर बँड, फटाके आणि जल्लोष हे याच दोन उमेदवारांच्या घरापैकी एका घरी होईल, म्हणजे प्रभाग क्रमांक 7 मधेच होणार आहे. त्यामुळे हरणाऱ्याला जिंकणाऱयाच्या जल्लोषाचा आवाज नाईलाजास्तव ऐकावा लागेल आणि प्रभाग क्रमांक 7 मधील लोकांची तर चांदीच आहे. जिंकेल कोणीही मात्र जल्लोष प्रभाग क्रमांक 7 मध्येच होणार म्हणून 23 मे ला या प्रभागातील लोक म्हणतील 'पार्टी तो बंती है'.