महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यात गुरुवारी दोघे कोरोनामुक्त, एकही नवा रुग्ण नाही; 26 'अ‌ॅक्टिव्ह केसेस'

पुणे, मुंबई व इतर राज्यातून 40 हजार 99 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आल्या असून 28 हजार 47 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच, अन्य ठिकाणाहून आलेल्या 12 हजार 252 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी 28 दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये, अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

भंडारा कोरोना न्यूज
भंडारा कोरोना न्यूज

By

Published : Jun 5, 2020, 9:12 AM IST

भंडारा - जिल्ह्यात गुरुवारी (3 जून) एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच, येथे दोन कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 असून 14 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

3 जूनला 39 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. तर, उपचार घेत असलेल्या 28 रुग्णांपैकी 2 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 40 असून कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या 14 झाली आहे. तर, अ‌ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या कमी होऊन 26 वर आली आहे. आतापर्यंत 2 हजार 114 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी 2 हजार 21 अहवाल निगेटिव्ह आले. तर, 40 अहवाल पॉझिटिव्ह आले. 53 अहवाल अप्राप्त आहेत.

ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येत आहेत, अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भरती करण्यात येत आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत.

आयसोलेशन वॉर्डमध्ये सध्या 39 व्यक्ती भरती आहेत. आतापर्यंत 331 व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 268 भरती आहेत. 1 हजार 532 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे, मुंबई व इतर राज्यातून 40 हजार 99 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आल्या असून 28 हजार 47 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच, अन्य ठिकाणाहून आलेल्या 12 हजार 252 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी 28 दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये, अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details