भंडारा - जिल्ह्यातील तुमसर-रामटेक रस्त्यावर कान्द्री गावाजवळ बसने ट्रकला धडक दिल्याने ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. देवेंद्र नथ्थुजी काळसर्पे (रा. नागपूर) असे मृत चालकाचे नाव आहे. या अपघातानंतर बस चालक घटना स्थळावरून पसार झाला आहे. ही मानव विकासची विद्यार्थी बस होती. बसमधील विद्यार्थी अपघाताच्या काही वेळा पूर्वी उतरल्यामळे मोठा अनर्थ टळला.
सकाळी 9 वाजेच्या सुमारास वाळूचा ट्रक क्र. एमएच. 31 सीक्यू 9564 हा तुमसर वरून रामटेकच्या दिशेने जात होता. कान्द्री गावाच्या जवळ या ट्रक पंचर झाल्यामुळे चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला लावला. ट्रकच्या मागे झाडाच्या हिरव्या फांद्याही लावल्या. आणि जॅक लावून टायर काढण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, यावेळी अचानक मागून आलेल्या बस क्र. एमएच. 07 सी 9524च्या चालकाने जोरदार धडक दिल्याने या ट्रकला लावलेले जॅक घसरले. त्यामुळे टिप्पर चालक हा चाकाखाली आल्याने त्याचा टायरमध्ये दबून जागीच मृत्यू झाला.