भंडारा - जिल्ह्यात आज (बुधवार) पुन्हा 7 नवीन लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच हाय रिक्समधील 2 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या 7 रुग्णांमध्ये भंडारा येथील 2, लाखनी येथील 3 तर मोहाडी येथील 2 लोकांचा समावेश आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढून 87 वर गेली आहे. तर आज 4 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 75 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बुधवारी मिळालेल्या सात लोकांपैकी लाखणी तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये केसलवाडा येथील 22 वर्षीय तरुण तर गराडा येथील 23 वर्षीय तरुण हे या अगोदर मिळालेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या हाय रिक्स कॉन्टॅक्टमधील रुग्ण आहेत. तर एक 22 वर्षीय तरुण हा 26 तारखेला औरंगाबाद येथून आलेला आहे. तर 53 वर्षीय महिला ही 26 तारखेला मुंबईवरून भंडारा शहरात आली होती. तसेच एक 27 वर्षीय महिला ही पुण्यावरून भंडाऱ्यात आली होती. तसेच मोहाडी तालुक्यतील 43 वर्षीय पुरुष 28 तारखेला मुंबईवरून आलेला होता. तर 28 वर्षीय पुरुष हा 26 तारखेला जम्मू वरून आलेला होता. या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.