भंडारा -तुमसर तालुक्यातील बिनाखी गावाच्या परिसरात वाघाने मागील काही दिवसापासून दहशत पसरवली आहे. या वाघाला वनविभागाच्या पथकाने पळवून लावले होते. मात्र, शनिवारी पुन्हा याच परिसरात वाघ दिसला. नागरिकांनी वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला असता चिडलेल्या वाघाने जमावावरच हल्ला चढवला.
VIDEO: वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांवर वाघाचा हल्ला - तुमसर वाघाचा हल्ला
तुमसर तालुक्यात वाघाने केलेल्या हल्ल्यात तीनजण जखमी झाले आहेत. वाघाला पळवून लावत असताना त्याने चिडून जमावावर हल्ला चढवला.
तिघांवर वाघाचा हल्ला
या हल्ल्यात तीन लोक गंभीर जखमी झाले आहेत. या तिन्ही लोकांना उपचारासाठी तुमसरच्या उपजिल्हा रुग्णायला दाखल केले. मात्र, तीनपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.
हेही वाचा - तारण म्हणून बँकेत ठेवले ५ किलो बनावट सोने; बँकांना कोटीचा गंडा
या प्रकरणाची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळावर पोहचली असून वाघाला जंगलाच्या दिशेने पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.