भंडारा -रस्त्याच्या कडेला असलेल्या 7 लोकांना मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने चिरडल्याची घटना घडली. यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तुमसर, बालाघाट या राज्य मार्गावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या मोहोड या गावात ही घटना घडली.
भंडाऱ्यात मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने ७ जणांना चिरडले, ३ जणांचा मृत्यू - महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर अपघात
रस्त्याच्या कडेला असलेल्या 7 लोकांना मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने चिरडल्याची घटना घडली. यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
भाजीपाला वाहतूक करणाऱ्या 407 वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीला जोरदार धडक देत, गाडीशेजारी उभ्या असलेल्या 7 जणांना चिरडले. यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला, तर 4 लोक जखमी झाले. ही घटना सकाळी 11 च्या सुमारास घडली. मृतकामध्ये शांतीलाल बुधे (45), अमित मते (20) दोन्ही राहणार मोहाड मध्य प्रदेश, तर मंगल बुधे (28) राहणार काटी पांढराबोडी तालुका मोहाडी, अशी मृतकांची नावे आहे. तर जखमींमध्ये शिवम प्रकाश (15), हेमराज शेंडे (18), नीलेश मते (12) अंशुल आथोडे (16) सर्व राहणार मोहाड तालुका खैरलांजी जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार मालवाहक (MP50 G 0336) या वाहनात नागपूरवरुन भाजीपाला भरुन बालाघाट येथे नेत होता. चालकाला झोप लागल्याने वाहन अनियंत्रित झाल्याने अपघात झाला. दरम्यान, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला (क्र. MH 12 Q 0133) वाहनाने जोरदार धडक देऊन शेजारी उभ्या असलेल्या ७ जणांना चिरडले. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. जखमींना तत्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.