भंडारा- लॉकडाऊनमुळे अनेक जण इतर जिल्ह्यात तसेच इतर राज्यात अडकले आहेत. या अडकलेल्या लोकांसाठी तहसील कार्यालय भंडारा यांच्यावतीने बसची सोय करण्यात आली. जिल्ह्यात अडकून पडलेल्या छत्तीसगड व मध्यप्रदेशातील ३३० नागरिकांना १५ बसमधून छत्तीसगड-मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात आले. तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वाखाली ही व्यवस्था करण्यात आली.
लॉकडाऊननंतर अडकलेले मजूर शेकडो किलोमीटरचे अंतर चालत आपल्या गावी जायला निघाले. तर काही मजूर लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत होते. तर काही मजूर पायी जात असतांना त्यांना जिल्ह्यातील शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले होते. इथे जेवणाची, राहण्याची व्यवस्था असल्याने हे मजूर जिल्ह्यात थांबले होते.
भंडाऱ्यात अडकलेले छत्तीसगड, मध्यप्रदेशातील ३३० नागरिक त्यांच्या राज्यात रवाना - कोरोना न्यूज भंडारा
काही मजूर पायी जात असतांना त्यांना जिल्ह्यातील शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले होते. इथे जेवणाची, राहण्याची व्यवस्था असल्याने हे मजूर जिल्ह्यात थांबले होते.
केंद्राने या सर्व मजुरांना विशेष बस किंवा ट्रेनने पाठविण्याची सवलत दिल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील या 330 मजुरांना त्यांच्या जिल्ह्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी सर्वांना एकत्रित आणले गेले. छत्तीसगडमधील ३१८ व मध्यप्रदेशमधील १२ नागरिकांचा यात समावेश आहे. छत्तीसगडमधील नागरिकांसाठी १४ बसेस तर मध्यप्रदेशातील नागरिकांसाठी एक बस सोडण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे बसची व्यवस्था मोफत करण्यात आली होती. तहसील कार्यालयाच्या वतीने बस स्थानकावर चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली होती. या सुविधेबद्दल नागरिकांनी शासन व प्रशासनाचे आभार व्यक्त केले.