भंडारा - 14 व्या सीनियर महाराष्ट्र राज्यस्तरीय नौकायन स्पर्धेचे येथील वैनगंगा नदीवर आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 3 ते 6 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्यातील सर्व जिल्ह्याच्या जवळपास 200 खेळाडूंनी यात सहभाग घेतला. ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीयस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
राज्यस्तरीय नौकायन स्पर्धा : भंडाऱ्यात पहिल्यांदाच झाले आयोजन राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या जिल्ह्यातील मुलांना इतर खेळात वाव मिळत नाही. पश्चिम विदर्भात आणि दक्षिणोत्तर भारतात प्रचलित असलेला हा नौकायन खेळ भंडारा जिल्ह्यातही प्रसिद्ध होत आहे. मागील ३ वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी वैनगंगा नदीवर नौकायनचे प्रशिक्षण घेत आहेत. गोसे धरणाच्या बॅक वॉटरमुळे वैनगंगा नदी बाराही महिने दुथडी भरून वाहते. याचाच फायदा जिल्ह्यातील खेळाडू घेत आहेत.
हेही वाचा -दाट धुके अन् ढगाळ वातावरणाने हरभऱ्याचे नुकसान... शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला नांगर!
जिल्ह्यातील खेळाडूंना कैनोइंग अँड कयाकिंग असोशिएशनमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात अनेक खेळाडूंनी या खेळात राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर भाग घेत पदक मिळविले आहे. तर या खेळाकरिता नदीची आवश्यकता असते. जिल्ह्यात वैनगंगा नदी असल्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने नौकायन स्पर्धेला अधिक वाव मिळत आहे. तर ज्याठिकाणी प्रशिक्षण घेतले त्याच ठिकाणी स्प्रर्धेचे आयोजन झाले. यामुळे खेळाडूंनी आनंद व्यक्त केला. तसेच अशा प्रकारचे खेळ होत राहिले तर विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल. आपल्या ग्रामीण भागातील मुले देखील देश पातळीवर खेळू शकतात. एवढेच नाही तर येणारा काळ खेळाडू ऑलिंपिकमधून पदकही मिळू शकतात, असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला.
हेही वाचा -सत्तापिपासू भाजप आता रक्तपिपासू झालाय, बाळासाहेब थोरातांचा प्रहार